मुंबई : दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांचं दिर्घ आजारानं निधन झालं. पण योगायोग म्हणजे विनोद खन्ना यांचा मित्र आणि बॉलीवूड अभिनेते फिरोज खान यांचंही ९ वर्षांपूर्वी याच दिवशी निधन झालं होतं. २७ एप्रिल २००९रोजी फिरोज खान यांचं निधन झालं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२७ एप्रिल २००९ला वयाच्या ६९व्या वर्षी फुफुसांच्या कॅन्सरमुळे फिरोज खान यांचा मृत्यू झाला तर विनोद खन्नांचं २७ एप्रिल २०१७ला वयाच्या ७० व्या वर्षी मूत्राशयाच्या कॅन्सरमुळे निधन झालं.


फिरोज खान यांनी विनोद खन्नांबरोबर चित्रपटात काम करण्यासोबतच त्यांच्या चित्रपटाचंही दिग्दर्शन केलं. १९७६मध्ये शंकर शंभू या चित्रपटात हे दोघं एकत्र दिसले. यानंतर १९८०मध्ये आलेल्या कुर्बानीचं दिग्दर्शन फिरोज खाननं केलं होतं. कुर्बानी हा बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला होता. १९८७मध्ये पुन्हा एकदा फिरोज खान यांच्या दिग्दर्शन असलेल्या दयावान या चित्रपटात विनोद खन्ना आणि माधुरी दिक्षीत एकत्र पाहायला मिळाले होते.