मुंबई : विनोद खन्ना गुरुवारी पंचतत्वात विलीन झाले. बॉलिवूडचे सर्वात हँडसम हीरो म्हणून त्यांची एकेकाळी ओळख होती. विनोद खन्ना त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये लोकांपासून दूर झाले होते. जेव्हा त्यांच्या परिवाराला आणि त्यांना कँसरबाबत कळालं तेव्हापासूनच ते लाईम लाईटपासून दूर होत गेले. त्यांनी लोकांना भेटणं देखील कमी केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील अडीज महिन्यांपासून विनोद खन्ना गिरगावच्या एचएन रिलायंस फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये उपचार घेत होते. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता ज्यामध्ये त्यांची प्रकृती खूपच बिकट झाल्याची दिसत होती. फोटो व्हायरल झाल्यानंतर खन्ना कुटुंबियांनी यावर नाराजी दर्शवली होती. विनोद खन्ना देखील यामुळे नाराज झाले होते.


एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार विनोद खन्ना देखील लोकांना भेटण्यासाठी तयार नव्हते. विनोद खन्ना यांनी लोकांना सांगितलं होतं की त्यांना भेटायला येऊ नका. कारण त्यांना या स्थितीत कोणी बघावं हे त्यांना आवडत नव्हतं. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला उपचार देखील मुंबईपासून दूर घेतले.