आमीरने रिलीज केला दंगलचा फर्स्ट लूक
जो जिता वोही सिंकदर, गुलाम, इश्क यांसारख्या रोमॅन्टिक भूमिकेनंतर आमीर खानचा एक नवा लूक त्याच्या चाहत्यांसमोर आलाय.
मुंबई : जो जिता वोही सिंकदर, गुलाम, इश्क यांसारख्या रोमॅन्टिक भूमिकेनंतर आमीर खानचा एक नवा लूक त्याच्या चाहत्यांसमोर आलाय.
बॉलिवूडचा 'द पर्फेक्शनिस्ट' आमीर खानचा आगामी चित्रपट 'दंगल'मधील रावडी लूक रिलीज झाला आहे. आमीरने स्वत: त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन दंगल चित्रपटामधील त्याचा हा फोटो शेअर केला आहे.
हा चित्रपट एक बायोपिक असून तो सुप्रसिद्ध कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या जीवनावर आधारित आहे. नेहमीच आपल्या अनोख्या भूमिकेतून चाहत्यांना भूरळ पाडणारा आमीर दंगलमध्ये कुस्तीपटू महावीर फोगट यांची भूमिका साकारणार आहे.
कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या आयुष्यावर आधारित ‘दंगल’ चित्रपट येत्या डिसेंबरमध्ये रिलीज करण्यात होणार आहे. महावीर फोगट यांनी आपल्या दोन कन्या गीता आणि बबिता कुमारी यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले अशी कथा चित्रपटात मांडण्यात आली आहे.
पाहा आमीरचा हा नवा लूक