मुंबई : मार्शल आर्टमध्ये कुशल असलेला अक्षय त्याच्या चित्रपटात नेहमी स्वत:च स्टंट करतो. मात्र तोही एक हाडामासाचा माणूस आहे. त्यालाही इजा होऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं आम्ही नाही म्हणतोय तर ट्विटरवर अक्षयच्या फोटोमुळे त्याच्या फॅन्समध्ये हा गैरसमज पसरलाय. 


अक्षयने काही तासांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केलाय. यात त्याच्या डोक्यावर पट्टी बांधलीये तर हाताला बांधून ठेवण्यात आलंय. या फोटोसह कॅप्शनमध्ये जॉली एलएलबी2चे लखनऊमधील शूटिंग संपलेय. लखनऊला मी मिस करेन, अस अक्षय म्हणालाय.


त्याच्या या फोटोनंतर अक्षय कुमारला दुखापत झाल्याचे त्याच्या फॅन्सना वाटले. त्यानंतर फॅन्सचे धडाधड ट्विट सुरु झाले. अनेकांनी तर अक्षयला विचारलेही हा शूटमधील प्रसंग आहे की खरोखर शूटिंगदरम्यान तो जखमी झालाय. 


फॅन्सच्या ट्विटच्या भडिमारामुळे अक्षयनेही एका चाहत्याला उत्तर देताना म्हटले, मी ठीक आहे. शूटिंगच्या सीनमधील हा एक भाग आहे.