मुंबई : बालकलाकार म्हणून चित्रपट सृष्टीत पाऊल टाकणारी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे ८०च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. त्यावेळी अनेक मोठमोठे दिग्दर्शक पद्मिनी यांना चित्रपटात घेण्यास उत्सुक होते. मात्र यादरम्यान एक घटना घडली ज्यामुळे जगभरात पद्मिनी यांच्या नावाची चर्चा झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९८०मध्ये ब्रिटनचे राजे चार्ल्स भारत दौऱ्यावर आले होते. चार्ल्स यांना मुंबईत बॉलीवूड चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. पद्मिनी ज्या चित्रपटाचे शूटिंग करत होत्या ते शूटिंग पाहण्यासाठी चार्ल्स आले. 


जेव्हा ही गोष्ट पद्मिनी यांना समजली तेव्हा प्रिन्स चार्ल्स यांचे सुरक्षाकडे तोडून धावत गेल्या आणि त्यांना किस केलं. पद्मिनी यांचे हे वागणे पाहून चार्ल्सही हैराण झाले. यावेळी हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर याची सर्व जगभर चांगलीच चर्चा रंगली. एका रात्रीत पद्मिनी जगभरात प्रसिद्ध झाल्या.