मुंबई : सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील वाद आता पूर्णपणे क्षमलेला दिसतोय. हे दोघे पुन्हा एकदा 'लंगोटी यार' बनून आपलं मेतकूट जमवताना दिसतायत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खान आणि शाहरुख खान यांचा दोस्ताना आणखीन मजबूत होताना दिसतोय. हे दोघे एकत्र सायकल सवारीवर निघाले आणि त्यांचे फोटो लगेचच व्हायरलही झाले.



यावेळी त्यांच्यासोबत शाहरुखचा मुलगा आर्यनही होता. मुंबईच्या रस्त्यांवर शाहरुख, सलमान आणि आर्यन आले आणि त्यांचे फोटो जाहीर झाले नाहीत, असं होणं तर शक्य नाही.


आपला आणि सलमानचा एक फोटो ट्विटरवर शेअर करत शाहरुखनं लिहिलंय 'भाई भाई ऑन बाईक बाईक, प्रदूषण नाही, भाई म्हणतोय, मायकल लाल सायकल लाल'