मुंबई: न्यूयॉर्क विमानतळावर मला अडवून ठेवून चौकशी करण्यात आली. तो प्रसंग मला अस्वस्थ करणारा होता, अशी प्रतिक्रिया बॉलीवूडचा किंग खान शाहरुखनं दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एप्रिल 2012मध्ये शाहरुखला अमेरिकेमध्ये अशी अपमानास्पद वागणूक मिळाली होती, त्यामुळे आपण नाराज आणि निराश झालो होतो, पण त्याविषयी आपल्या मनात द्वेषाची भावना नाही, असंही शाहरुख म्हणाला आहे.


एका मुलाखतीवेळी शाहरुख खानला न्यूयॉर्क एअरपोर्टवर झालेल्या त्या प्रसंगाबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यानं ही प्रतिक्रिया दिली.