मुंबई: भाभीजी घर पर है या शोमधून अंगुरी भाभी म्हणजेच शिल्पा शिंदे प्रसिद्धी झोतात आली. पण प्रो़ड्यूसरसोबत झालेल्या वादामुळे शिल्पाला ही सिरियल सोडावी लागली. 


शीतल खंदाल होणार अंगुरी भाभी ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिल्पानं सिरीयल सोडल्यानंतर या अंगुरी भाभीच्या रोलसाठी ऑडिशनही झाल्या आहेत. त्यामुळे आता शिल्पाच्या ऐवजी शीतल खंडाल अंगुरी भाभीची भूमिका करेल, अशा चर्चा आहेत. शीतलनं याआधी बालिका वधूमध्ये गेहनाची भूमिका केली होती. 


रश्मी देसाई, सुचेता खन्ना नाही


अंगुरी भाभीच्या भूमिकेसाठी रश्मी देसाई आणि सुचेता खन्ना यांच्या नावाच्याही चर्चा सुरु होत्या, पण या चर्चा फेटाळून लावण्यात आल्या आहेत. आमच्या समोर दोन ते तीन नावं आहेत, शीतलनंही ऑडिशन दिली आहे, पण याबाबतचा अंतिम निर्णय झाला नाही, अशी प्रतिक्रिया या सिरीयलच्या प्रॉ़ड्यूसरनं दिली आहे.