मुंबई : सध्या सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे बाहुबली द कनक्लूजन या सिनेमाची. या सिनेमातील भव्यदिव्य दृश्ये, कमाल ग्राफिक्स, कलाकारांचा अभिनय, ठिकाणे याचीच चर्चा आहे. या सिनेमातील इंटरव्हलआधीच्या पहिल्या भागात देवसेना आणि अमरेंद्र बाहुबली यांची प्रेमकहाणी दाखवलीये. अमरेंद्र बाहुबलीचे कॅरेक्टर पाहून 21व्या शतकातील प्रत्येक मुलीला आपला आयडियल नवरा असाच असावा असे वाटते. यामागची कारणे घ्या जाणून...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमात आपण सर्वांनी हे पाहिलं असेल जेव्हा बाहुबली म्हणतो की देवसेना को किसी ने हाथ भी लगाया तो समजो बाहुबली की तलवार को हाथ लगाया. या डायलॉगनंतर सर्वाधिक टाळ्यांचा कडकडाट होतो तो मुलींच्या कंपूमधून. आपला स्वाभिमान जपणारा आपला नवरा असावा अशी प्रत्येक मुलीची अपेक्षा असते. ही देवसेनेची अपेक्षा बाहुबली पूर्ण करतो. 


जेव्हा अमरेंद्र देवसेनेच्या राज्यात जातो तेव्हा तो वेष बदलून जातो. त्याचा साधेपणाच देवसेनेला भावतो. बाहुबली आपण इतक्या मोठ्या राज्याचे सम्राट आहोत हे जाणवूही देत नाही. त्याच्या साधेपणावर देवसेना भाळते. हल्लीच्या मुलींनाही हेच हवे असते. तुम्ही कोण आहात याआधी तुम्ही एक माणूस आहात. 


जेव्हा कटप्पा देवसेनेच्या घरच्यांना बाहुबलीचे खरे रुप सांगतो तेव्हा सर्वच जण बाहुबलीला नमस्कार करतात. देवसेनेचे भाऊ-वहिनीही बाहुबलीसमोर झुकतात तेव्हा बाहुबली त्यांना म्हणतो, समंधी एक दुसरे के गले लगते है उनके आगे झुकते नही है महाराज. या वाक्याने तो देवसेनेच्या घरच्यांची मने जिंकतो. मुलींनाही त्याचा आदर ठेवण्यासोबतच तिच्या घरच्यांचाही आदर ठेवला जावा अशी अपेक्षा असते. 


बाहुबली सिनेमातील अमरेंद्र बाहुबली हा नेहमी देवसेनेच्या पाठी खंबीर उभा राहतो. बोटीमध्ये चढताना जेव्हा देवसेनेचा तोल जातो तेव्हा बाहुबली पाण्यात उडी घेतो आणि देवसेना त्याच्या खांद्यावरुन बोटीत जाते. तुम्ही राजे असा अथवा दुसरे कोणी तुमच्या पत्नीसाठी तुम्ही सदैव तेथे असला पाहिजे. 


अमरेंद्र बाहुबली हा पत्नी देवसेनासाठी महिष्मती राज्याचे सिंहसन सोडतो. त्याला शिवगामी देवीने दोन पर्याय दिलेले असतात देवसेना की सिंहासन. मात्र देवसेनेसाठी तो सिंहासन सोडण्याचा निर्णय घेतो. मुलींनाही आपल्या आयडियल नवऱ्याने आपल्यासाठी थोडं सॅक्रिफाईज करावे असे वाटतेच.


आई आणि बायकोच्या भांडणात नवऱ्याने गप्प राहणेच फायदेशीर असते. या सिनेमातीलही एका सीनमध्ये जेव्हा बाहुबलीला सिंहासन देण्यावरुन देवसेना आणि शिवगामी देवी यांच्यात वाद होतो. तेव्हा अमरेंद्र बाहुबली शांत राहणे पसंत करतो. 


या सिनेमातील सर्वांना आवडणारा सीन म्हणजे बाहुबली ज्याप्रमाणे त्या मंत्र्याचे शीर कापतो. त्या डायलॉगलाही लोकांची मोठी पसंती मिळतेय. हेच नवऱ्याकडून मुलींना हवे असते.