मुंबई : बाहुबली 2 नावाच्या त्सुनामीने तर बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड उद्धवस्त केलेत. हिंदीसह दुसऱ्या भारतीय भाषांमध्येही हा सिनेमा छप्परफाड कमाई करतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरातील कमाईत एस एस राजामौली यांच्या या सिनेमाने 1300 कोटींचा आकडा पूर्ण केलाय. तज्ञ रमेश बाला यांच्या माहितीनुसार, बाहुबली 2 द कनक्लूजन या सिनेमाने जगभरात तब्बल 1390 कोटींची कमाई केलीये.


रमेश बाला यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिलीये. आता बाहुबली 2 ची नजर 1500 कोटींवर आहे. लवकरच हा आकडाही पार होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय.