मुंबई : झी मराठीवरील नव्याने सुरू झालेली मालिका 'रात्रीस खेळ चाले' या रहस्यमय मालिका कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घातलं नाही, हा एक केवळ निखळ मनोरंजनाचा विषय असल्याचे स्पष्टीकरण झी मराठीचे बिझनेस हेड दीपक राजाध्यक्ष यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले. 


बदनामीचा खेळ नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 'रात्रीस खेळ चाले' या रहस्यमय मालिकेला कोकणप्रेमींच्या संघटनांकडून विरोध होऊ लागलेला असतानाच, आता शिवसेनेनंही कोकणच्या बदनामीचा हा 'खेळ' बंद करण्याचा इशारा दिला आहे. झी मराठीच्या लोअर परेल इथल्या कार्यालयाबाहेर मोर्चा काढून आज शिवसेनेच्या महिला आघाडीनं आपला तीव्र निषेध नोंदवला होता.  


भूत दाखविले नाही, दाखविणार नाही


राजकीय पक्षांचे सर्व दावे फेटाळत राज्याध्यक्ष म्हणाले, ही एक काल्पनिक कथा आहे. त्यात पहिल्या भागापासून कुठेही भूत दाखविले नाहीत आणि या पुढे दाखविणार नाही. भूत नाहीच आहे आम्हांला दाखवायचे आहे. जस जशी मालिका पुढे जाईल तसा या सर्व गोष्टींचा उलगडा होईल. अभिनयात नऊ रस आहे, त्यात भय हा एक रस आहे. तो रस घेऊन आम्ही ही कलाकृती केली आहे. त्यात फक्त मनोरंजन हा भाग आहे. झी मराठी नेहमी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आली आहे आणि करत राहणार, असे ही राजाध्यक्ष यांना सांगितले. 


शेक्सपिअरच्या नाटकातही भूत


माणसाच्या मनात भीती असते, ती भीती चाळविण्याचा प्रयत्न या मालिकेतून करण्याचा प्रयत्न आहे. शेक्सपिअरनेही आपल्या नाटकात भूतांचा वापर केला. ते पात्र म्हणून नाटकांमध्ये होते. त्यामुळे आपण असं म्हणतो का की शेक्सपिअरने अंधश्रद्धेला खतपाणी घातले. जीए, खानोलकर, रत्नाकर मतकरी या सारख्या लेखकांनाही या काही फिक्शन लिहीले आहेत. त्यातील अनेक लेखक हे कोकणातले आहे. कोकणातील निसर्ग हा अशा कथांना जन्म घातलो. त्यामुळे आपण असं म्हणतो का की या सर्व लेखकांनी अंधश्रद्धेला खतपाणी घातले आहे.  ते आपण ज्या पद्धतीने घेतो तसं या मालिकेकडे आपण पाहिले पाहिजे, असेही राज्याध्यक्ष यांनी सांगितले. 


 


शास्त्रज्ञ महिला 


या मालिकेत एक शास्त्रज्ञ महिला आहे. ती या सर्व गोष्टींकडे कसा शास्त्रीय दृष्टीकोन ठेवून पाहते हे दाखविण्यात आले आहे. हीच महिला पुढे हे भूत खेतांचं थोथांड उलगडून दाखवेल हे आपल्याला दिसणार आहे, असेही या मालिकेच्या कथानकाबद्दल राज्याध्यक्ष यांनी सांगितले.