शेतमजुरांच्या ११ मुलींचा सामूहिक विवाह थाटात
शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी सामूहिक विवाह मेळावा घेण्यात आला... एकूण 11 मुलींचे या सामूहिक विवाह मेळाव्यात थाटात लग्न लावून देण्यात आले.
नांदेड : शेतकरी वडील हुंडा देऊ शकत नसल्याने एकीकडे लातूरमध्ये शीतल ने आत्महत्या केली असतांना, दुसरीकडे नांदेड मध्ये गरजु शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी सामूहिक विवाह मेळावा घेण्यात आला... एकूण 11 मुलींचे या सामूहिक विवाह मेळाव्यात थाटात लग्न लावून देण्यात आले.
बळीराजा बाप हुंडा देवू शकत नसल्यानं एकीकडे लातूरमध्ये शीतल वायाळनं आत्महत्या केली असताना दुसरीकडे नांदेडमध्ये शेतमजुरांच्या मुलींसाठी सामूहिक विवाह मेळावा घेण्यात आला. एकूण 11 मुलींचे सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न लावून दिलं. विवाहबद्ध वधूवरांनी आनंद तर व्यक्त केलाच शिवाय हुंडा प्रथेऐवजी सामूहिक विवाह मेळाव्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली.
या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी युवासेनेनं पुढाकार घेतला. मंगळसूत्र, कपडे आणि संसारोपयोगी वस्तू वधू-वरांना देण्यात आल्या. पुढील वर्षी अधिक मुलींचं लग्न लावून देण्याचा संकल्प युवा सेनेनं व्यक्त केला.
तीन वर्षांपासून पडलेला दुष्काळ आणि यंदा चांगला हमीभाव मिळाला नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. अशात उपवर मुलींचं लग्न लावून देणं अवघड झालंय. त्यात हुंड्यासारख्या प्रथेनं मुलींच्या पालकांसमोर गंभीर प्रश्न उभा राहिलाय. त्यामुळे असे सामूहिक विवाह सोहळे अधिकाधिक प्रमाणात घेण्याची गरज आहे...मात्र त्याहूनही अधिक गरज आहे ती हुंडाप्रथा बंद करण्याची.