पुणे : बारामती तालुक्यातल्या चांदगुडेवाडी, खैरेवाडी आणि पंचक्रोशीतल्या गावक-यांत सध्या आनंदाचं वातावरण आहे. ऐन गणेशोत्सवात चांदगुडेवाडीनं दिवाळी साजरी केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांदगुडेवाडी, खैरेवाडीत सध्या असं दिवाळीसारखं वातावरण आहे. सुबत्ता आणि विकास याचं उदाहरण मिरवणा-या बारामती तालुक्यातली ही काही गावं गेल्या काही वर्षांपासून उपेक्षेच्या गर्तेत अडकली होती.


 शेजारी असलेल्या अष्टविनायकातल्या मोरगाव आणि उर्वरित तालुक्याशी जोडणारा पूलच कोसळल्यानं या गावांचा संपर्क तुटला होता. 


डोंबिवलीतल्या गणेश योगिनी संध्याताई अमृते यांना ग्रामस्थांनी आणि माजी सरपंच पोपटराव तावरे यांनी पूल पुन्हा बांधून देण्याची विनंती केली. 


ग्रामस्थांची ही अडचण लक्षात घेऊन लोकसहभागातून आणि संध्याताई अमृते प्रतिष्ठान पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून क-हा नदीवर नवा कोरा पूल विक्रमी वेळेत बांधण्यात आला.


110 मीटर लांब आणि 4.25 मीटर रुंद अशा 25 कमानींच्या या पुलाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला.


या पुलाच्या बांधणीमुळे ग्रामस्थांचा मोठा फायदा झालाय.  कित्येक किलोमीटरचा वळसा घालण्याची गरज उरलेली नाही. त्यामुळेच सामाजिक कार्याचं एक उदाहरण म्हणून नक्कीच या पुलाचं उदाहरण देता येईल.