पुण्यात नाल्यातून 14 वर्षांचा मुलगा वाहून गेला
शहरातील सदाशिव पेठेतील अंबिल ओढा झोपडपट्टीतून जाणाऱ्या नाल्यातून 14 वर्षांचा मुलगा वाहून गेला. त्याचा शोध घेतला असता तपास लागला नाही. दरम्यान, शोध मोहीम संध्याकाळी थांबविण्यात आली.
पुणे : शहरातील सदाशिव पेठेतील अंबिल ओढा झोपडपट्टीतून जाणाऱ्या नाल्यातून 14 वर्षांचा मुलगा वाहून गेला. त्याचा शोध घेतला असता तपास लागला नाही. दरम्यान, शोध मोहीम संध्याकाळी थांबविण्यात आली.
हा मुलगा नाल्यावळ खेळत होता. यावेळी त्याचा चेंडू नाल्यात पडला. तो पाहताना अल्पवयीन मुलगा नाल्याच्या भिंतीला पडलेल्या भगदाडातून थेट नाल्यात पडला. वेगाने वाहत असलेल्या सांडपाण्यातून चेंडू बाहेर काढण्याच्या प्रयत्नात मुलगा वाहून गेला.
नाल्यातून मुलगा वाहून गेल्याचे समजताच अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नाल्यात वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरू केला. मात्र, त्या मुलाचा ठावठिकाणा लागला नाही.