अहमदनगर : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याची घटना ताजी असतानाच अहमदनगर जिल्ह्यामधल्या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१४ वर्षीय मुलगी शेतात गेली असताना दोन अज्ञात इसमांनी मुलीला अडवले. शाळेत का जाते? असा सवाल करत मुलीच्या हातावर ब्लेडसारख्या धारदार शस्त्राने वार केले.


दरम्यान याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. 


दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ बेलवंडी गावात ग्रामस्थांनी बंद पुकारला असून गावात निषेध सभा घेण्यात आली.