मुंबई : इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून जिल्हापरिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळांकडे मुलांचा ओढा वाढत असल्याची माहिती आज शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुमारे 14000 मुलं इंग्रजी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये दाखल झाली आहेत अशी आकडेवारीही तावडेंनी सभागृहात दिलीय. 


चांगल्या दर्जाचं शिक्षण आणि स्पोकन इंग्लिशवर भर दिल्यानं जिल्हापरिषदेच्या शाळेतला ओढा वाढल्याचंही तावडेंनी म्हटलयं. यावेळी तावडेंनी प्रयोगशील शिक्षकांचं विशेष अभिनंदनही केलंय.