पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातली दारु विक्री बंद झालीये. पुण्यामध्ये फाईव्ह स्टार हॉटेल आणि मिलट्रीच्या कॅन्टीनमध्येही सध्या दारू मिळत नाहीये. या निर्णयामुळे पुणे शहरातील तब्ब्ल पन्नास टक्के वाईन शॉप आणि परमिट रूम बंद झाली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे शहर, पिंपरी- चिंचवड आणि जिल्ह्यात एकूण २४९९ वाईन शॉप आणि परमिट रूम आहेत, त्यापैकी १६०० बंद झाली आहेत. त्यात १७० वाईन शॉप, ९०० परमिट रूम तर, १९७ देशी दारूची दुकानं यांचा समावेश आहे.


पुण्यात ४२ राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग आहेत. त्यांची लांबी ३२०० किलोमीटर आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान फक्त पुण्यात २०० कोटींचा महसूल बुडाला. वर्षभरात ८०० कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे.