एसटीचे १७ हजार निलंबीत कर्मचारी पुन्हा सेवेत
महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या निलंबीत कर्मचा-यांना सरकारने मोठा दिलासा दिलाय.
पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या निलंबीत कर्मचा-यांना सरकारने मोठा दिलासा दिलाय.
जवळपास १७ हजार निलंबीत कर्मचा-यांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय.
परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली. पिंपरी चिंचवडमध्ये एसटी चालकांचं तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर सुरू आहे, त्य़ाच्या उदघाटन प्रसंगी त्यांनी ही घोषणा केली.
एवढंच नाही तर राज्याच्या ग्रामीण भागातही लवकरच एसी बस सुरू केल्या जाणार आहेत अशी माहिती रावते यांनी दिलीय.