ठाणे : बिहारमधून मुंबईत मजुरीसाठी आणलेल्या १९ अल्पवयीन मुलांची वाहतूक करणाऱ्या १४ जणांना ठाणे लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत १९ मुलांची सुटका करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्लेखनीय म्हणजे, रविवारीच बालकामगार विरोधी दिन साजरा करण्यात आला... आणि दुसऱ्याच दिवशी या १९ बालकांची कचाट्यातून सुटका करण्यात आलीय. 


कशी झाली सुटका... 


बिहार राज्यातून मजुरीच्या कामासाठी जनसाधारण एक्स्प्रेसने मुंबईत आणली जात होती. एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ही माहिती मिळाली होती. 


जनसाधारण एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला या स्थानकावर थांबते. पण सोमवारी हीच गाडी ठाणे स्टेशनवर पोलिसांनी थांबवली. पहाटे साडे पाचच्या दरम्यान फलाट क्रमांक ८ वर सापळा रचून पोलिसांनी १९ बालकामगारांची सुटका केली. सुटका करण्यात आलेली मुलं १० ते १७ वयोगटातली आहेत.