औरंगाबादमध्ये घाटी रुग्णालयाचे १९० डॉक्टर निलंबित
पाच दिवसापासून सामुहिक रजेवर गेलेल्या डॉक्टरांवर आता कारवाईला सुरुवात झाली आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातल्या 190 डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे.
औरंगाबाद : पाच दिवसापासून सामुहिक रजेवर गेलेल्या डॉक्टरांवर आता कारवाईला सुरुवात झाली आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातल्या 190 डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे.
राज्यातल्या सरकारी रुग्णालयाते निवासी डॉक्टर सलग पाचव्या दिवशी रजेवर आहेत. खरंतरं काल दिवसभरात मुंबई उच्चन्यायालय, सरकार या दोन्ही महत्वाच्या संस्थानी योग्य ती सुरक्षा वाढण्यात येईल असं स्पष्ट केल्यानंतर आज सकाळापासून डॉक्टर कामावर येणं अपेक्षित होतं. पण आता कालचा तोडगा फक्त मुंबई पुरताच होता. आता राज्याच्या इतर भागातल्या निवासी डॉक्टरांच्या समस्यांचं गाऱ्हाणं मांडायचं राहून गेलंय. त्यामुळे राज्यातल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयातले प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
दुपारी एक वाजता ही बैठक होईल. यावेळी सरकारकडून लेखी आश्वासनाची अंमलबजावणी कशी होणार, कुठल्या कॉ़लेजमध्ये किती गार्ड मिळणार याविषयी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेण्यात येणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. दरम्यान आज सलग पाचव्या दिवशी रुग्णांचे हाल मात्र सुरूच आहेत.