पुण्यात २ उमेदवारांमध्ये जोरदार हाणामारी
पुण्यातली महापालिका निवडणूकीची रणधुमाळी किती तापली आहे. याचं उत्तम उदाहरण आज घोले रोडच्या निवडणूक कार्यालयात बघायला मिळालं. घोले रोडच्य़ा कार्यालयात भाजपचे विद्यमान गटनेते गणेश बीडकर आणि मनेसेचे माजी गटनेते आणि आता काँग्रेसवासी झालेले रवींद्र धंगेकर यांच्यात जोरदार हाणामारी झाली.
पुणे : पुण्यातली महापालिका निवडणूकीची रणधुमाळी किती तापली आहे. याचं उत्तम उदाहरण आज घोले रोडच्या निवडणूक कार्यालयात बघायला मिळालं. घोले रोडच्य़ा कार्यालयात भाजपचे विद्यमान गटनेते गणेश बीडकर आणि मनेसेचे माजी गटनेते आणि आता काँग्रेसवासी झालेले रवींद्र धंगेकर यांच्यात जोरदार हाणामारी झाली.
अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. काँग्रेसचे बंडखोर अस्लम बागवान उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आले होते. त्यावेळी धंगेकर बागवानांच्य़ा बरोबर होते. त्याच वेळी बागवान तिथे आले, आणि अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं बीडकरांनी म्हटलंय. कॉंग्रेसचा अंतर्गत प्रश्न असल्याने बीडकरांनी हस्तक्षेप करू नये असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी म्हटल्यावर वाद वाढत गेला आणि गणेश बीडकर आणि रवींद्र धंगेकर यांच्या हाणामारी झाली.