महाड : महाड दुर्घटनेतील 20 जणांचे मृतदेह सापडेत. त्यापैकी 14 मृतदेहांची ओळख पटलीय. तर आज सकाळपासून सापडलेल्या सहा मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरु झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळी मुसळधारा पावसानं शोधकार्यात अडथळा निर्माण झाला. शोधकार्यासाठी एनडीआरएफच्या जवानांना सावित्री नदीत उतरताच आलं नाही. प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींच्या आधारे एकूण 38 बेपत्ता नागरिकांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. 


दरम्यान वाहून गेलेल्या एसटीच्या दोन बसेस आणि टव्हेराचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. दुर्घटनेला आता साठ तास उलटलेत. एनडीआरएफ, नौदल आणि कोस्टगार्डच्या जवानांनी पुन्हा एकदा शोध मोहीम सुरू केलीय. 20 जणांचे मृतदेह सापडले असले, तरी उरलेल्या 18 जणांसाठी आज दिवसभर काम चालणार आहे.


जस जशी वेळ पुढे सरकरतेय, तस तशी कुणीही जिवंत वाचण्याची शक्यता धुसर होतेय. अनेक बेपत्ता नागरिकांचे नातेवाईक महाडमध्ये गर्दी करताय. महाड इथल्या ग्रामीण रूग्णालयात 4 डॉक्टरांचे पथक तयार आहे. तीसहून अधिक मृतदेह ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आलीय.. खाडीकिनारी ठिकठिकाणी रूग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्यात.