नागपूरच्या निरीक्षण गृहातून २१ मुलांचे पलायन
नागपूरातील शासकीय निरीक्षण गृहातून 21 मुलं पळून गेलीत. रविवारी रात्री 9च्या सुमारास ही घटना घडलीये. निरिक्षण गृहातील कर्मचा-याच्या डोळ्यात मिरचिची पूड टाकून ही मुलं पसार झालीत.
नागपूर : नागपूरातील शासकीय निरीक्षण गृहातून 21 मुलं पळून गेलीत. रविवारी रात्री 9च्या सुमारास ही घटना घडलीये. निरिक्षण गृहातील कर्मचा-याच्या डोळ्यात मिरचिची पूड टाकून ही मुलं पसार झालीत.
या घटनेनंतर महिला व बालकल्याण विभागासह प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजलीये. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण शहरात या मुलांचा शोध सुरु करण्यात आलाय. मध्यरात्री यातील 10 मुलं सापडली असून 11 मुलं अजूनही बेपत्ता आहेत.
ही मुलं गेल्या काही वर्षात बेवारस अवस्थेत सापडली होती. त्यांना पालक नसल्यानं बालकल्याण समितीच्या निर्देशाप्रमाणे त्यांची रवानगी शासकीय निरीक्षण गृहात करण्यात आली होती. इथून मुलं पळून जाण्याची ही पहिलीच वेळ नाही 2013मध्येही या निरीक्षण गृहातून 17 मुलं पळून गेली होती. त्यामुळे या निरीक्षणगृहाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जातोय.