नवी मुंबई : नवी मुंबईतल्या एका फायनान्स कंपनीवर सशस्त्र दरोडा पडला. सीवुड इथल्या सेक्टर-४२ मधील पॉप्युलर फायनान्स कंपनीवर हा दरोडा टाकण्यात आला आहे. 23 किलो सोन्याची लूट करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वीफ्ट डिझायनर कारमधून सहा दराडेखोर आले होते..त्यातील एक जण गाडीतच बसून होता.  इतर पाच जणांनी कंपनीत घुसून बंदुकीचा धाक दाखवत 23 किलो सोनं आणि साडे नऊ लाखांवर डल्ला मारला.


कंपनीच्या मॅनेजरच्या डोक्यावर बंदूक रोखत ही लूट करण्यात आली. हे दरोडेखोर मराठीत संवाद साधत असून चेह-यावर मास्क लावून होते अशी माहिती कंपनीत उपस्थित कर्मचा-यांनी दिलीय. 


या लुटीनंतर दरोडेखोर गाडीत बसून पसार झालेत.. कंपनीनं कोणताही सुरक्षारक्षक नेमला नव्हता.. त्यामुळं आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.