अहमदनगर : शहरात तब्बल ३८ लाख ५० हजार रुपये रोकड सापडली. जुन्या चलनातील एक हजाराच्या या नोटा आहेत. मध्यरात्री पेट्रोलींग करताना पोलिसांना या नोटा आढळल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल भंडारी नावाच्या व्यक्तीकडे ही रोकड सापडली. रात्रीच्या वेळी संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना राहुलकडे चौकशी केली असता रोकड तसेच लहान मुलांच्या खेळण्यातील पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटांचा सापडले. या संदर्भात सुरुवातीला राहुलनं पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बॅग आणि रोकड जप्त करुन गुन्हा दाखल केला. 


पोलिसांनी तब्बल ४ तास पंचनामा करुन दोन बॅगांमध्ये १८ लाख ५० हजार रुपये सापडल्याचे सांगितले. त्यानंतर मीडियाने अधिक माहिती घेतली असता अर्धा तासात पुन्हा पंचनामा करुन आरोपीच्या जॅकेटमध्ये २० लाख सापडल्याचे सांगत एकूण ३८ लाख ५० हजार रुपये जप्त केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.


दरम्यान यामध्ये एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असे असले तरी पोलिसांना १८ लाख ५० हजार रुपयांचा पंचनामा करायला ४ तास लागले. मात्र नंतर केवळ काही वेळातच २० लाखांचा पंचनामा पोलिसांनी केला. याबाबत संशय व्यक्त होत आहे.