पिंपरी-चिचवड : (कैलास पुरी, झी मीडिया) संत तुकारामनगरमधून, ज्यांच्या आई-वडीलांना रोजगारासाठी भटकावं लागतं अशा मुलांच्या शिक्षणाचं काय..? हा प्रश्न आपोआपच निर्माण होतो. पण अश्या शाळाबाह्य मुलांना शाळेत घेण्यासाठी पिंपरी चिंचवडमधल्या महापालिकेच्या शिक्षकांनी प्रयत्न केलेत .आणि आता तब्बल ४२ शाळा बाह्य मुलं शाळेत जायला लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठ्या ऐटीत शाळेत येत असलेली ही मुलं आहेत नंदीवाले समाजातली. त्यांचे आई वडील पिंपरी चिंचवडमध्ये रोजगाराच्या निमित्ताने येतात. त्यामुळं ही मुलं इथं भटकत राहतात किंवा खेळत राहतात. 


याच मुलांवर पिंपरी चिंचवडच्या संत तुकारामनगरमधल्या महापालिकेच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांची नजर पडली.. आणि त्यांनी थेट त्यांच्या पालकांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं.. आज तब्ब्ल ४२ मुलं शाळेत येतायेत...!


शाळेत जायला मिळाल्यानं या मजुरांच्या मुलांच्या चेहऱ्यावर चांगलंच समाधान आहे.