अहमदनगर : जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यामधल्या एका तरुणाच्या बँक खात्यावर, तब्बल साडे पाच कोटी रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे एकच खळबळ माजली. प्रत्यक्षात स्टेट बँकेनं आपल्या कायदेशीर बाबींच्या पुर्ततेसाठी हा मेसेज पाठवल्याचं समोर आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिप्लोमा आयटीचं शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या शोधात असलेल्या कोळपेवाडीतल्या स्वप्नील बोरावके या तरुणाच्या मोबाईलवर एक मेसेज येऊन धडकला, आणि काही क्षण स्वप्नील सुन्नच झाला. 


स्वप्नीलचं सेव्हींग्ज अकाऊंट असलेल्या कोपरगावमधल्या स्टेट बँक ऑफ इंडीयातून त्याला हा मेसेज आला होता. स्वप्नीलच्या खात्यात अवघे 1 हजार 494 रुपये होते. मात्र आता त्याच्या खात्यावर पाच कोटी पंचावन्न लाख पाचशे पंच्चावन रुपयांची रक्कम दाखवली जात होती. 


दरम्यान, वारंवार कळवूनही खातेदारांनी आपली अद्ययावत माहिती स्टेट बँकेला दिलेली नाही. त्यावर माहिती मिळवण्याकरता उपाय म्हणून, तालुक्यातल्या ४०० खातेदारांची बँक खाती होल्ड करुन, त्याच्या खात्यावर ५ ते साडेपाच कोटींची रक्कम दाखवण्यात आल्याचं बँक व्यवस्थापकांनी सांगितलंय. 


ग्राहकांना अजब धक्का देत बँकेशी संपर्क साधण्याची नामी शक्कल बँकेनं लढवली. हा मेसेज निट बघितला तर त्यात रक्कम क्रेडिट ऐवजी क्रिएटेड असं लिहिलेला हा मेसेज आहे. मात्र बँकेची ही युक्ती एखाद्यासाठी हर्षवायूचा धक्का देत जिवघेणीही ठरु शकली असती, याचाही विचार होणं गरेजंच आहे.