५ लाखात घर देण्याचा बहाणा, आता मेपल बाऊंसर्सची ग्राहकाला मारहाण
मेपल कंपनीकडून पैसे परत घ्य़ायला आलेल्या ग्राहकांवर मेपलचे बाऊंसर्स दादागिरी करत असल्याचं उघड झालंय. आज ग्राहकाला बाऊंसर्सनी मारहाणही केली.
पुणे : मेपल कंपनीकडून पैसे परत घ्य़ायला आलेल्या ग्राहकांवर मेपलचे बाऊंसर्स दादागिरी करत असल्याचं उघड झालंय. आज ग्राहकाला बाऊंसर्सनी मारहाणही केली.
बाऊंसर्सकडून होत असलेल्या मारहाणीची दृष्य झी २४ तासच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. वैयक्तीक कारणास्तव पैसे परत घेत आहोत, मेपल विरोधात काही तक्रार नाही, असा फॉ़र्मही ग्राहकांकडून जबरदस्तीने लिहून घेतला जात आहे, असा आरोप ग्राहकांनी केलाय.
५ लाखात घर योजनेचा फुगा फुटल्यानंतर आता ही योजना आणणाऱ्या मेपल ग्रुपनं ग्राहकांचे बुकिंगचे पैसे परत करण्यास सुरूवात केली आहे. पुण्यामध्ये कंपनीच्या कार्यालयाबाहेर पैसे परत घेण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात.
आपली फसवणूक होता होता वाचली, याचा आनंद या ग्राहकांच्या चेहऱ्यावर आहे. या प्रकरणाला वाचा फोडून आपल्याला न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांनी झी २४ तासचे आभार मानलेत.