पुणे : चलनातून बंद झालेल्या 500 तसेच 1000 रुपयाच्या जुन्या नोटा बदली करण्याच्या प्रकरणात हेराफेरी करणा-या पाच पोलिसांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आलंय. हे पाचही जण पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत, पोलीस कर्मचारी अजिनाथ शिरसाट, अश्वजित सोनवने, संदीप रिठे आणि हेमंत हेंद्रे अशी या बडतर्फ पोलिसांची नावं आहेत. २ फेब्रुवारीला केलेल्या एका कारवाईत कोथरूड पोलिसांनी ६६ लाखांच्या नोटा जप्त केल्या होत्या. 


मात्र, संबंधित पोलीस अधिकारी तसंच कर्मचा-यांनी केवळ २० लाखांच्या नोटा जप्त केल्याचं दाखवून तब्बल ४६ लाखांचा घोटाळा केला. या प्रकरणाची पोलखोल झाल्यानंतर चौकशीमध्ये ५ जणांना दोषी ठरवण्यात आलं. त्यानुसार पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या आदेशानुसार त्या ५ जणांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय.