शिर्डीतील दानपेटीत ५००, १०००च्या नोटांच्या संख्येत वाढ
नोटांच्या घोळाचा परिणाम देवस्थानांमध्येही दिसुन येतोय. शिर्डीत दानपेटीत गेल्या तीन दिवसांत हजाराच्या नोटांची संख्या वाढल्याचं समोर आलंय.
शिर्डी : नोटांच्या घोळाचा परिणाम देवस्थानांमध्येही दिसुन येतोय. शिर्डीत दानपेटीत गेल्या तीन दिवसांत हजाराच्या नोटांची संख्या वाढल्याचं समोर आलंय.
देणगी काऊंटरवर पाचशे आणि हजाराच्या नोटा स्विकारणार नसल्याचं जाहीर करताच दानपेटीत या नोटांची वाढ झालीय. हजाराच्या तब्बल पाच हजार पाचशए बावन्न नोटा दानपेटीत जमा झाल्यात. तर पाचशेच्या 11 हजार सातशे बत्तीस नोटा दानपेटीत आहेत.
दानाच्या रकमेत मात्र फारशी तफावत दिसत नाहीत. तीन दिवसात एक कोटी 51 लाखांचं दान साई संस्थानला आलंय. याशिवाय 64 ग्राम सोनं आणि अडीच किलो चांदीही दानात आलीय. पण इकडे शिर्डीत व्यापारी पेठेत मात्र सरासरी उत्पन्नात घट दिसतेय.