अहमदनगर : शिर्डीचे ग्रामस्थ आणि हजारोच्या संख्येने येणा-या साईभक्तांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी, शिर्डीच्या साईबाबा संस्थानने पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून साई संस्थाननं राज्य सरकारला पाचशे कोटी रुपये देऊ केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीळवंडे धारणातून कालवे आणि जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. भविष्यात हे पैसे सरकारला साई संस्थानला परत द्यावे लागणार आहेत. जवळपास ७० ते ८० किलोमीटरचे कालवे खोदून आणि जलवाहिनी टाकून त्याद्वारे नीळवंडे धारणातलं पाणी शिर्डीत आणलं जाणार आहे. 


प्रत्यक्षात कालवे आणि त्यात बंद जलवाहिनीच्या कामासाठी एकूण जवळपास दोन हजार कोटींचा निधी लागणार आहे. त्यामुळे शिर्डी संस्थाननं देऊ केलेल्या ५०० कोटी रुपयांत ही कामं कशी पूर्ण होणार, तसंच राज्य सरकार या कामासाठी उर्वरीत निधी देणार का, असा प्रश्न विचारला जातोय.