पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या रहाटणीमध्ये एक लग्नाच्या वऱ्हाडातील ५३ जणांना कुल्फीतून विषबाधा झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रहाटणीच्या थोपटे लॉन्समध्ये रविवारी रात्री लग्न होते. त्यात काही जणांनी कुल्फी खाल्ल्याने 53 जणांना विषबाधा झाली. यामध्ये 12 पुरुष,16 मुले,12 मुली तर 13 महिला होत्या. यापैकी 19 जणांना वायसीएममध्ये तर 34 जणांना औंध हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. 


त्यातील सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या आरोग्याला कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलेय. तसेच काहींना हॉस्पिटलमधून घरी पाठविण्यात आलय. वाकड पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय..   तर कुल्फीचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याच पोलिसांनी सांगितलं.