ठाण्यात परदेशातील युरेनियमचा मोठा साठा जप्त
गुन्हे शाखेने ठाण्यातील घोडबंदर रोडवर युरेनियम विक्रीसाठी येणार आल्याची माहिती मिळवून २७ कोटी रुपयांचे आठ किलो ८६१ ग्राम युरेनियम जप्त केले. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. हे युरेनियम भारताबाहेरच्या असल्याचे तपासात उघड झाले आहे.
ठाणे : गुन्हे शाखेने ठाण्यातील घोडबंदर रोडवर युरेनियम विक्रीसाठी येणार आल्याची माहिती मिळवून २७ कोटी रुपयांचे आठ किलो ८६१ ग्राम युरेनियम जप्त केले. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. हे युरेनियम भारताबाहेरच्या असल्याचे तपासात उघड झाले आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात युरेनियम आणण्यामागचा नेमका काय हेतू होता याचा तपास पोलीस करत आहेत. अशा प्रकारे किरणोत्सर्ग पदार्थं सापडल्यामुळं मोठी खळबळ माजली आहे. दोन आरोपीना ताब्यात घेतले असून युरेनियम एनर्जी कायद्यानुसार गुन्हा दाखल होणार असून साधारण गुन्ह्यांपेक्षा हा गुन्हा वेगळा आहे. या प्रकारात आणखी तपस होणे आवश्यक असून त्यासाठी गुन्हे शाखा तपस करत असल्याचे ठाणे पोलिसांनी सांगितले आहे.