वर्धा : नागपूर मार्गावर सेलडोह येथे आज सकाळी ७.३५ च्या दरम्यान ट्रक आणि ट्रव्हल्सचा अपघात झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघातात ट्रॅव्हल्समधील दोन ठार झालेत तर नऊ जण जखमी झालेत. ट्रॅव्हल्समध्ये एकून ४० प्रवासी होते.


हे सर्व प्रवासी एका कंपनीचे कर्मचारी असल्याचं कळतंय. सकाळच्या शिफ्टला कंपनीत जात असताना हा अपघात झाला.


ट्रॅव्हल्स वर्ध्याहून बुटीबोरीला जात असताना नागपूरहून येणाऱ्या ट्रकनं ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली. जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.