चंद्रपूर : चंद्रपूरात इंडिका कार नाल्यात पडून चौघेजण बैपत्ता झालेत. कोठारी ते येनबोडी दरम्यानच्या किन्ही पुलावर ही दुर्घटना घडलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दुर्घटनेत कारमधून प्रवास करणारे चारही शिक्षक बेपत्ता आहेत.. हे चौघे कोठारीहून येनबोडीकडे जात होते. यावेळी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं गाडी थेट नाल्यात कोसळली. 


यात चौघे शिक्षक बेपत्ता असून हे सर्व नव्याने सुरु झालेल्या एका कॉन्व्हेंट स्कूलचे आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले असून चौघांचा शोध सुरु आहे.