पिंपरी चिंचवड : दापोडी-बोपोडीला जोडणाऱ्या विनियर्ड चर्च जवळील पुलाखाली एक वयोवृद्ध व्यक्तीला डंपरने चिरडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघातात आसाराम तुकाराम कांबळे (वय ६७, राहणार तुकाराम नगर, काटे वस्ती दापोडी) असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुलाखालील जागेचा वाहनतळ म्हणून उपयोग केला जात आहे. पुलाखालील रस्ता खराब झाल्याने तेथे महापालिकेतर्फे डांबरीकरणाचे काम चालू आहे. त्यासाठी येथे खडी आणून टाकली जात आहे. 


पार्किंगच्या जागेत सावली असल्याने दुपारी अडीचच्या सुमारास आसाराम येथे झोपले होते. ते याच परिसरात राहत असल्याने दररोज दुपारी या ठिकाणी झोपण्यासाठी येत होते. डंपर चालक डंपर मागे घेत असताना त्याला आसाराम दिसले नाही. त्यामुळे त्याच्या अंगावरून खडी वाहून नेणारा डंबर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 


अपघात झाल्यानंतर डंपरचा चालकाने  डंपर बाजूला घेऊन स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला असून घडलेला प्रकार त्याने पोलिसांना सांगितला.