मुंबई : मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर पहाटे तीनच्या सुमारास पवना पोलीस चौकी, कामशेत येथे मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर अपघात झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मारुती सीयाज (एम.एच. १४ इयू ७०३८) गाडीला अपघात झाला. गाडीवरील चालकाचा ताबा सुटून ही गाडी पलटी झाली आणि टपावर घसरत जात दोन्ही लेनच्यामध्ये असणाऱ्या वायफन रोपला जावून धडकली.


या अपघातात पाच जण जागीच ठार झालेत तर एक जण गंभीररित्या जखमी झालाय. जखमीला लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याल आलंय.


मृतांमधील तरुण हे पुण्यातील असल्याची शक्यता असून पोलीस या मृतांची ओळख पटविण्याचे काम करीत आहे.