मॉडेल अर्शी खानला पुण्यात हॉटेलमध्ये अटक, सेक्स रॅकेटचा आरोप
पाकिस्तानचा क्रिकेटर शाहीद आफ्रीदीशी आपले संबंध असल्याचा गौप्य स्फोट करणारी आणि न्यूड फोटोशूट करणाऱ्या वादग्रस्त मॉडेल आणि अभिनेत्री अर्शी खानला पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अटक करण्यात आली. तिच्यावर देहविक्रीचा आरोप आहे. मंगळवारी पहाटे हॉटेल अरोरा टॉवरमध्ये ही कारवाई करण्यात आली.
पुणे : पाकिस्तानचा क्रिकेटर शाहीद आफ्रीदीशी आपले संबंध असल्याचा गौप्य स्फोट करणारी आणि न्यूड फोटोशूट करणाऱ्या वादग्रस्त मॉडेल आणि अभिनेत्री अर्शी खानला पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अटक करण्यात आली. तिच्यावर देहविक्रीचा आरोप आहे. मंगळवारी पहाटे हॉटेल अरोरा टॉवरमध्ये ही कारवाई करण्यात आली.
तिच्यासह आढळून आलेल्या एजंटला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, वानवडीमधील रेस्क्यू होममधील महिला आणि कर्मचा-यांना मारहाण करुन ही मॉडेल पसार झाली आहे.
विपुल पवनबहाद्दर दलाल (रा. आसाम) असे अटक एजंटचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार शैलेश जगताप यांना ही मॉडेल दोन दिवसांपासून पुण्यात असून विपुलच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, सहायक पोलिस आयुक्त सुरेश भोसले, वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांच्या सुचनांनुसार बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी हॉटेलवर मध्यरात्री रात्री एकच्या दरम्यान छापा टाकून मॉडेल व एजंटला ताब्यात घेतले.
मॉडेलची रवानगी मोहम्मदवाडी येथील रेस्क्यू होममध्ये करण्यात आली. परंतु तेथील महिला व कर्मचा-यांना मारहाण करून ही मॉडेल पसार झाली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा पुण्यातील हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय समोर आला आहे.
संबंधित मॉडेल मूळ भोपाळ येथील राहणारी असून गेल्या काही वर्षांपासून मीरा भाईंदर मध्ये राहात आहे. ती मॉडेलिंग, जाहिरात आणि चित्रपट क्षेत्रात काम करते.