मुंबई : भुजबळांच्या अटकेनंतर त्यांच्या प्रभाव क्षेत्रात अर्थात उत्तर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमठलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येवल्यात छगन भुजबळांच्या समर्थकांनी रात्रीच दुकानं बंद केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विंचूर चौफुला इथं रास्तारोको करण्याता प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीनं त्यांना पांगवल्यानं हा प्रयत्न फसला.


तर घोटी इथं झालेल्या दगडफेकीत दोन गाड्यांचं नुकसान झालं. नाशिक तसेच मालेगावातही वातावरण तणावपूर्वण झालंय. 


 


धुळ्यात जल्लोष...


छगन भुजबळांच्या अटकेनंतर धुळ्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील भाजप आमदार अनिल गोटे यांच्या समर्थकांनी हा आनंदोत्सव साजरा करीत जल्लोष केला.


ढोल ताशांच्या तालावर थिरकत आमदार गोटे समर्थकांनी रात्री शहराच्या विविध भागात मोटारसायकल रॅली काढत भुजबळांच्या अटकेचा आनंदोत्सव साजरा केला. धुळे शहरातील शिवतीर्थ चौक, पाचकंदील, खंडेराव मंदिर परिसर, साक्री रोड या भागात फटाके फोडून भुजबळांच्या अटकेचं स्वागत केलं. भविष्यात अजित पवार आणि त्यापाठोपाठ धुळे शहरातील नेतेही जेलची हवा खातील असा विश्वास गोटे समर्थकांनी व्यक्त केला. या कार्यकर्त्यांचा जोष पाहिल्यानंतर आमदार गोटे यांच्या घरासमोर तात्काळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.