ठाणे : कल्याण पश्चिमेला अल्पवयीन मुलीवर काही महिन्यापूर्वी अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याचा प्रकार घडला होता. या 17 वर्षीय पीडित मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीने शुक्रवारी रात्री एका लहान मुलाला जन्म दिला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुलीने शुक्रवारी रात्री एका लहान मुलाला जन्म दिला आहे. मुलीच वय कमी असल्यामुळे डॅाक्टरांना संशय आला, त्यांनी ताबडतोब खडकपाडा पोलिसांना कळवले. पोलिसांनी पीडित मुलीची चौकशी केली, 


असता अज्ञात तरुणाने काही महिन्यांपूर्वी बलात्कार करुन तो पळून गेला आहे. त्यानंतर ही पीडित मुलगी गर्भवती राहिली असल्याचे समोर आले आहे. त्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु आहे.