कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी पुकारला संप
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसले आहे. त्याला राज्यभरातल्या बाजार समितींनी पाठिबा दर्शवला आहे. त्यामुळे याचा परिणाम उद्या जाणवणार आहे.
नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसले आहे. त्याला राज्यभरातल्या बाजार समितींनी पाठिबा दर्शवला आहे. त्यामुळे याचा परिणाम उद्या जाणवणार आहे.
शेतमालावरची आडत व्यापाऱ्यांनी भरावी असे निर्देश राज्य सरकरने दिलेत. सरकरच्या या निर्णययाचा विरोध करत व्यापाऱ्यांनी बंदची घोषणा केली आहे. नाशिक बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी उद्यापासून बेमुदत बंदच हत्यार उपसले आहे.
शेतीमालाच्या खरेदी विक्री व्यवहारात ६ टक्के आडत दिली जाते. ही वसुली शेतक-याकडून घेण्याची आजवरची प्रथा होती. ही प्रथा मोडीत काढून व्यापाऱ्यांनी आडत भरावी असा निर्णय राज्य सरकरने जाहीर केला. त्याला व्यापा-यांनी विरोध केलाय. याचा फटका शेतक-यांना बसणार आहे.