सोलापूर : धरणाबाबत केलेल्या त्या वक्तव्यामुळे माझं खुप वाटोळं झालं आहे, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. 


मी दुधानं पोळलो आहे, त्यामुळे ताकही फुंकून पितो, असंही अजितदादा म्हणाले आहेत. तसंच कार्यकर्त्यांनी बोलताना जिभेवर नियंत्रण ठेवावं, कोणाच्या भावना दुखावू नयेत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. ते सोलापूरात आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात बोलत होते.