बारामती : येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये तुम्ही लंगोट लावून या किंवा बिनालंगोटाचे या, तुम्हाला चितपट केल्याशिवाय राहणार नाही. असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकांच्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बंड करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. या निवडणुकांमध्ये भाजपही राष्ट्रवादीला शह देण्याची जोरदार तयारी करत आहे. यावरूनच अजित पवारांनी ही टीका केली आहे. 


अनेक राजकीय घडामोडी घडल्यानंतरही बारामतीकरांनी आम्हाला साथ दिली, त्यामुळेच विकास झाल्याचंही अजितदादा म्हणाले आहेत. बारामती नगरपालिकेच्या कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. सत्ता नसलेली काही मंडळी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांशी ओळख असल्याच्या थापा मारतात त्यांच्याकडे लक्ष न देण्याचं आवाहनही अजितदादांनी बारामतीकरांना केलं आहे.