नंदुरबार : स्त्री शक्तीचा जागर म्हणून खानदेशात अक्षय तृतीया म्हणजेच आखाजी सणाकडे पाहिलं जातं. खानदेशात अहिराणी भाषेच्या पट्ट्यात अक्षय तृतीयेला आखाजी संबोधलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आखाजी निमित्तानं सासुरवाशिणी माहेरी येऊन, मनमुराद आनंद लुटतात. वसंताच्या नव्या बहराचं स्वागत करत, झोक्यावर हिंदोळे घेत पारंपरिक अहिराणी गीतं गात आणि खेळ खेळून महिला आनंद साजरा करतात. खरीपाच्या पेरणीची तयारीही याच सणानंतर सुरु केली जाते. 


पूर्वजांचं स्मरण म्हणून आखाजीला डेरग भरण्याची प्रथा आहे. यात मोठा आणि छोटा माठ घेऊन त्यात पाणी भरुन आणि खरबुजाचा प्रसाद देऊन आणि पंचपक्वान्नं तयार करुन पूर्वजांना नैवेद्य दाखवला जातो.