मतदान केंद्राचं सर्व काम सांभाळतायत महिला
आज जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान होतंय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरुळमध्ये जिल्हा निवडणूक आयोगाने अनोखा उपक्रम राबवलाय.
औरंगाबाद : आज जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान होतंय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरुळमध्ये जिल्हा निवडणूक आयोगाने अनोखा उपक्रम राबवलाय.
वेरुळमधल्या संपूर्ण मतदान केंद्राचा कारभार महिलांच्या हातात आहे. विशेष म्हणजे इथे तैनात असणाऱ्या पोलीस अधिकारीही महिलाच आहेत. मतदान प्रक्रियेतलं हे महिलाराज पाहून मतदानासाठी येणाऱ्या महिलांचाही उत्साह वाढतोय.
येथील पोलिंग बुथवर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतात, त्या जागी देखील सर्व पक्षांनी महिला प्रतिनिधींनाच पाठवलं आहे.
या पोलिंग बुथवर काम करणारे अधिकारी, कर्मचारी, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, सुरक्षा देणारे पोलिस कर्मचारी, पोलिस अधिकारी या सर्व महिला आहेत. विशेष म्हणजे वेरूळचा हा मतदारसंघ जिल्हा परिषदेसाठी देखील महिला राखीव असल्याने उमेदवार देखील महिलाच आहेत.
फरक एवढाच आहे की, पुरूष मतदार फक्त येथे मतदान करण्यासाठी येतील तेवढेच पुरूष येथे दिसणार आहेत.