स्वाती नाईक, नवी मुंबई : हापूस आंब्याची चव भल्या भल्यानं वेड लावते. परदेशातदेखील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तो त्याच्या अविट चवीमुळेच... आंब्याची ही चव राखून आंबे परदेशात पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतून आखाती देशात आंबा चक्क स्कॅन करून पाठवला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हापूस आंबा पार परदेशात जाऊन पोहचला आहे. आखाती देशाप्रमाणे युरोप, जापानमध्ये आंबा निर्यात केला जातो. यासाठी हिट वॉटर सिस्टिम, वेपर हिट सिस्टिम, ई किरण अशा विविध चाचण्या केल्या जातात. विशेष म्हणजे आंबा स्कॅन करून पाठवला जातोय. विविध देशांच्या मागणीनुसार आंब्याची ट्रीटमेंट करून पाठवली जाते.


आखाती देशांप्रमाणे युरोपमध्ये आंबा निर्यात केला जातो. पण युरोपियन देश हॉट वॉटर सिस्टममधून प्रक्रिया केलेला आंबा मागवतात. या प्रक्रियेत आंबा पूर्ण उकडून पाठवला जातो. त्यामुळे त्याची चव बदलते. शिवाय खर्चही जास्त येतो. त्यामुळे एकूण निर्यातीपैंकी फक्त सहा टक्के आंबा युरोपात जातो. तिकडे जपानमध्ये आंबा पाठवताना त्यावर 'वेपर हिट' प्रक्रिया केली जाते. निर्यातीसाठी पाठवण्यात येणाऱ्या आंब्याची सबसीडी रद्द करण्यात आलीय. शिवाय विमान कंपन्या आंबा वाहतूकीसाठी अव्वाच्या सव्वा दर लावतात. त्याचाही निर्यातीवर विपरित परिणाम होतोय. 


शासन सबसीडी देत नसले तरी शासनाने निर्यात वाढीसाठी सुविधा देण्याची गरज व्यापारी बोलून दाखवत आहेत. प्रक्रियांचा खर्च वाढत असताना, शासनानं आंबा निर्यतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी सध्याच्या धोरणात सकारात्मक बदल करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागलीय.