सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटात रस्ता खचलाय. त्यामुळे मार्गावरून जाणाऱ्या वाहतुकीला मोठा धोका निर्माण झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मार्गावरून सिंधुदुर्गहून बेळगावकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असते. शिवाय पावसाळी पर्यटकांनसाठी आंबोली घाट म्हणजे फेव्हरेट डेस्टिनेशन आहे. 


साहजिकच रस्ता खचल्यानं वाहतूकीची मोठी गैरसोय होतेय. मंगळवारी पहाटेच्या सुमारास या रस्त्याचा कडा कोसळला आहे.


सध्या सार्वजनिक विभागानं एकेरी वाहतूक सुरु असली तरी वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहने हाकावी लागत आहेत.