पुणे : गडकिल्ल्यांवर मद्यपान, धुम्रपान तसेच मांसाहाराला बंदी आहे. असं असताना पुण्यातील सिंहगडावर शनिवारी रात्री एक दारुपार्टी रंगली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडकिल्ल्यांवर मद्यपान, धुम्रपान तसेच मांसाहाराला बंदी आहे. असं असताना पुण्यातील सिंहगडावर शनिवारी रात्री एक दारुपार्टी रंगल्याचं पुढे आले आहे. हा प्रकार गडावर स्वच्छता मोहिमेसाठी गेलेल्या दुर्गप्रेमींच्या लक्षात आला. तेव्हा त्यांनी ही पार्टी उधळून लावली. 


सिंहगडावरील एका खासगी बंगल्यात ही पार्टी सुरु होती. पार्टी करणारे एका खाजगी बॅंकेचे कर्मचारी असल्याचं कळतय. शिवाधिन दुर्ग संवर्धन ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी ही पार्टी थांबवून या पार्टीबहाद्दराना पोलिसांच्या ताब्यात दिलं. यापूर्वी लोहगड तसेच राजमाची किल्ल्यांवर अशाच पार्ट्या झाल्याचं उघडकीस आलं होतं.


गड किल्ल्यांचं पावित्र्य तसेच स्वच्छता राखण्याच्या दृष्टीकानातून पुरातत्व विभागाने त्या ठिकाणी दारु पिण्यास तसेच मांसाहार करण्यास बंदी घातलेली आहे. असे प्रकार टाळण्यासाठी वन विभागाकडून चेक पोस्ट देखील उभारण्यात आले आहेत. असं सगळं असताना पर्यटकांचा बेजबाबदारपणा रोखण्यात अपयश येत असल्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.