माऊलींसाठी उभं रिंगण, तुकोबांसाठी मेंढ्यांचं रिंगण
सावळ्या विठूरायाच्या ओढीने पंढरीची वाट चालणाऱ्या वारीतील पहिलं उभे रिंगण चांदोबाचा लिंब इथं पार पडणार आहे.
सातारा : सावळ्या विठूरायाच्या ओढीने पंढरीची वाट चालणाऱ्या वारीतील पहिलं उभे रिंगण चांदोबाचा लिंब इथं पार पडणार आहे.
लोणंद इथला अडीच दिवसांचा मुक्काम आटोपून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा खंडाळा तालुक्यातून मार्गस्थ होणार आहे.
पालखीचा सातारा जिल्ह्यातील तिसरा मुक्काम फलटण तालुक्यातील तरडगाव इथं असणार आहे.
काटेवाडीत मेंढ्यांचं रिंगण
तर दुसरीकडे टाळ-मृदंगाचा गजर आणि पखवाजाच्या तालावर पावल्या करत पंढरीच्या दिशेने निघालेल्या संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात बुधवारी काटेवाडीत मेंढ्याचे रिंगण होणार आहे. त्यानंतर इंदापूर तालुक्यातील सणसर येथे पालखीचा मुक्काम होईल.