सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधील महत्वाची आणि प्रसिद्ध आंगणेवाडीची यात्रा यंदा 2 मार्चला होणार आहे. प्रति पंढरपूर नावाने आंगणेवाडीची ही यात्रा प्रसिद्ध आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या यात्रेस सुमारे 10 लाख भाविक हजेरी लावतात. यात्रेनिमित्त सामान्यांसह नेतेमंडळी दरवर्षी यात्रेला मोठ्या संख्येनं हजेरी लावतात. यंदा मात्र नेत्यांची ही गर्दी वाढण्याची शक्यता आहे.


मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेते मोठ्या संख्येने आंगणेवाडीच्या यात्रेला हजेरी लावण्याची चिन्हं आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  नवस बोलणे, नवस फेडणे यासाठी नेते आंगणेवाडीला येण्याची शक्यता आहे.